भरधाव कारची दोन वाहतूक पोलिसांना धडक

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लेन कटिंग आणि ओव्हर स्पीडची कारवाई करण्यासाठी व्हीडिओ रेकॉर्डिग करणाऱ्या दोन वाहतूक पोलिसांना महिला चालकाने उडवले. रेखा शहा असे महिला चालकाचे नाव असून; तिला लोणावळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मळवलीजवळ ही घटना घडली.

या घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा पाय फ्रॅक्चर झाला असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे.

मुंबईवरून पुण्याला येताना रेखा शहा या स्विफ्ट डिझायर कार वेगात चालवत होत्या. या वेळी त्यांच्या गाडीचा नंबर घ्यायला पुढे आलेल्या पोलिसांना त्यांनी उडवले. त्यानंतर विरुद्ध दिशेला जाऊन अन्य एका कारला धडक दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *