पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचा जवान शहीद

भारत देश उत्साहात दिवाळी साजरी करत असतानाच, सीमेपलिकडून पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला.

तंगधरमध्ये घुसखोरीचा डाव हाणून पाडताना झालेल्या चकमकीत बीएसएफचा जितेंद्र सिंह हा जवान शहीद झाला. सलग दुस-या दिवशीही जम्मू, राजौरी, कथुआ, सांबा, पूंछ या भागात पाकिस्तानकडून गोळीबार केला गेला.

गेल्या दोन दिवसांत पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात, बीएसएफचे दोन जवान शहीद झाले आहेत. दरम्यान पाकिस्तानी गोळीबाराला तोडीस तोड उत्तर देताना, बीएसएफनं आर एस पुरामध्ये एका पाकिस्तानी जवानाला ठार मारलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *