आर.आर. आबांची कन्या राष्ट्रवादी युवतीची अध्यक्ष

माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांची कन्या स्मिता पाटील  यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. यावेळी पक्षाने टाकलेली जबाबदारी पेलण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे, आबांची प्रतिमा सांभाळणे हे मोठे आव्हान असल्याचंही स्मिता पाटील यांनी यावेळी सांगितला.

युवतीचं संघटन बळकट करण्यावर आपण भर देणार आहोत, युवती आणि महिलांच्या सबलीकरणासाठी आपण काम करणार आहोत, तसेच शिक्षण घेत असताना शिक्षणाबरोबर पक्षाचे काम करणार असल्याचं स्मिता पाटील यांनी सांगितलं.

युवतींना राजकारणात सक्रीय व्हावे म्हणून प्रयत्न करणार, राज्यातील युवती आज सुरक्षित नाहीत, आबांचा गृहखात्यावर अंकुश होता, तसा अंकुश आज दिसत नाही, मुख्यमंत्र्यांनी गृहखाते वेगळे ठेवावे, हे सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी असल्याचं स्मिता पाटील यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *