रोज सकाळी खा एक मूठ भिजवलेले चणे

रोज सकाळी खा एक मूठ भिजवलेले चणे

उसळी, भाज्यासाठी वापरलेलेचणे आरोग्यासाठी पौष्टिक आहेत. भिजवलेले चणे खाल्ल्यास यातून प्रोटीन, फायबर, खनिजे आणि व्हिटामिन मोठ्या प्रमाणात मिळतात. रोज सकाळी एक मूठ भिजवलेले चणे खाल्ल्यास शरीरासाठी मोठे फायदेशीर आहे

चण्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते. अॅनिमियासारख्या आजारांवर फायदेशीर आहे चणे.

चण्यांमध्ये फॉस्फरस, मँगनीजसारखी खनिजे असतात. ज्यामुळे त्वचेचे विकार दूर होतात.

चण्यातील अल्फा लिनोलेनिक अॅसिड आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड कोलस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात.

दूध आणि दह्यात जितके कॅल्शियम असते तितके कॅल्शियम चण्यामध्ये असते. यामुळे हाडे मजबूत होतात.

चण्यात फॉस्फरसची मात्रा अधिक असल्याने हिमोग्लोबिनचा स्तर वाढतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *