औरंगाबादमध्ये कौर्याची परिसीमा, बालिकेच्या गुप्तांगावर सिगारेटचे चटके

कौर्याची परिसीमा गाठणारी एक लांच्छनास्पद घटना समोर आलीय. एका तीन वर्षीय बालिकेला घरात डांबून तिच्या गुप्तांगासह संपूर्ण शरीरावर सिगारेटसह गरम वस्तूने चटके दिल्याचं उघड झाले आहे.

पोलिसांच्या दामिनी पथकाने या चिमुरडीची औरंगाबादच्या सिडको N-9 भागातून सुटका केली. हे अमानुष कृत्य करणाऱ्या दोन महिलांसह अन्य चौघांना पोलिसांनी अटक केलीय. या बालिकेच्या आईला पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं असून, मुलीच्या आईच्या जबाबानंतर खरा प्रकार समोर येऊ शकेल.

या मुलीच्या अवस्थेवरून तिची विक्री झाली असल्याची शंका व्यक्त होत असून यामागे एखादी टोळी सक्रीय आहे का याचाही तपास आता पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *