प्रेमाचा सच्चेपणा तपासण्यासाठी ‘तिने’ प्रियकराकडे पाठवली ‘पॉर्नस्टार’

  • प्रियकर-प्रेयसी, पती-पत्नी या नात्यामध्ये विश्वास महत्वाचा आहे. या नात्यांमध्ये विश्वासाचा पाया ठिसूळ असेल तरी ही नाती तुटायला वेळ लागत नाही. आपल्या जोडीदारावर विश्वास नसला की, काहीजण मोबाईल फोन चेक करतात किंवा अन्य मार्गाने निष्ठा तपासतात.
    अनेकदा अन्य मार्गाने जोडीदाराबद्दल खात्री पटवून घेताना नाते अधिक भक्कम होण्याऐवजी तुटून जाते. परदेशात एका युवतीने आपल्या प्रियकराची निष्ठा तपासण्यासाठी चक्क व्हॅलरी व्हाईट या पॉर्नस्टारची मदत घेतली. अशा प्रकारे नात्याची परीक्षा घेणे तिला चांगलेच महाग पडले. ‘टू कॅच ए चिटर’ या रिअॅलिटी टीव्ही शो च्या माध्यमातून तिने आपल्या प्रियकराबरोबर पॉर्न स्टारची भेट घडवून आणली.
    व्हॅलरीने युवतीच्या प्रियकराला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला पण प्रियकराने पॉर्नस्टारमध्ये कोणताही रस दाखवला नाही. पण नंतर त्याने आपला नंबर तिला दिला व एखादादिवस फिरायला जाऊ असे सांगितले. जेव्हा प्रेयसीने प्रियकराला त्याची अशा प्रकारे परिक्षा पाहिल्याचे सांगितले. तेव्हा जाहीरपणे प्रेमाचे असे प्रदर्शन करुन संशय घेतला म्हणून त्याने तात्काळ नाते तोडून टाकले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *