पुण्यात बसला अचानक लागली आग

पुण्यात पीएमपीएमएलच्या बसला गुरूवारी सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. अग्नीशामकदलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आग आटोक्यात आणली आहे.

पीएमपीएमएलची वारजे माळवाडी बस (एमएच१४ सीडब्लू १६९३) गुरूवारी सकाळी पावणेदहा वाजता गणपती माथा मंदिराजवळ उभी असतांना अचानक बसमधून धूर निघायला सुरूवात झाली.  या बसमध्ये प्रवासी प्रवास करत नव्हते तसेच बस चालक जेवन करायला खाली उतरलेला असल्याने मोठी दुर्घटना टळली.

या घटनेची माहिती मिळताच अग्नीशामक दलाच्या जवानांना घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.  तोपर्यंत या बसचा पुढील भाग पुर्णपणे जळून खाक झाला होता.  ही आग शोर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *