शुभांगी खटावकर यांची हत्या एकतर्फी प्रेमातून

शुभांगी खटावकर यांची हत्या एकतर्फी प्रेमातून

शुभांगी खटावकर यांची हत्या एकतर्फी प्रेमातून झाली आहे. आरोपी विश्वास कळेकरला अटक करण्यात आल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. शुभांगी खटावकर या ३० वर्षीय महिलेची काल पुण्यात हत्या करण्यात आली होती.

कोथरूडमध्ये दिवसा भररस्त्यात शुभांगी खटावकर यांची हत्या करण्यात आली. त्या आपल्या बाईकने जात असताना त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले.

शुभांगी खटावकर या दुसऱ्याच्या घरी स्वयंपाक करण्याचं काम करत होत्या, त्या सकाळी-सकाळी कामावर जात असताना आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *