उत्तर बगदादमध्ये अंत्यविधीसाठी जमलेल्या लोकांमध्ये करण्यात आलेल्या भीषण आत्मघाती हल्ल्यात ४६ जण ठार झाले असून इतर ६५ जण गंभीर जखमी झाले आहेत, असे इराकी पोलीस आणि रुग्णालयाच्या अधिका-यांनी सांगितले.
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा आत्मघाती हल्ला शनिवारी दुपारी करण्यात आल्याचे एका पोलीस अधिका-याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. मात्र या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.
दरम्यान, इराकी सुरक्षा दलाने आणि सैन्याने या परिसरात हल्लेखोरांना पकडण्यासाठी तपास मोहीम राबवली आहे. दहशतवादी संघटना इसिसच्या ताब्यातून महत्त्वाचे मोसूल शहर इराकी सैन्याने नुकतेच ताब्यात घेतल्यामुळे बिथरलेल्या दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणल्याचे सूत्रांकडून म्हटले जात आहे