मुंबई, ठाणे वगळता सर्व जिल्ह्यात आचारसंहिता लागू

राज्यातील २१२ नगरपालिका, नगरपंचायती आणि नगरपरिषदांमधील निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहीर करण्यात आला. एकूण चार टप्प्यांमध्ये मतदान होणार असल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

या निवडणुका २७ नोव्हेंबर, १४ व १८ डिसेंबर आणि ८ जानेवारी २०१७ अशा चार टप्प्यांत होणार आहेत. या निवडणुकांमुळे राज्य निवडणूक आयोगाने मुंबई, ठाणे वगळता सर्व जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्याची घोषणा केली. मतदान झाल्यानंतर दुस-याच दिवशी मतमोजणी करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज दिली.

२१२ नगरपरिषदांमध्ये मुदत संपणा-या १९० नगरपरिषदा, ४ नगरपंचायती, २ नवनिर्मित परिषदा आणि १६ नगरपंचायतींचा समावेश आहे. २१२ नगरपरिषदांमधील ४, ७५० जागांसाठी निवडणूक होणार असून यामध्ये २,४४५ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी ६०८, अनुसूचित जमातींसाठी १९८ तर मागासवर्ग प्रवर्गासाठी १,३१५ जागा आरक्षित आहेत.

पहिल्या टप्प्यात २७ नोव्हेंबर रोजी २५ जिल्ह्यांतील १६५ पालिकांसाठी मतदान होईल. दुस-या टप्प्यात १४ डिसेंबर रोजी पुणे व लातूर जिल्ह्यातील पालिकांच्या निवडणुका होणार आहेत. तिस-या टप्प्यात १८ डिसेंबर रोजी औरंगाबाद, नांदेड, भंडारा व गडचिरोली या चार जिल्ह्यांतील २२ नगरपंचायती व नगरपरिषदेसाठी मतदान होईल. चौथ्या टप्प्यात ८ जानेवारी २०१७ रोजी नागपूर व गोंदियातील ११ नगर पंचायतींसाठी मतदान होईल. यंदा नगरपालिकांसाठी नगराध्यक्षांची निवड थेट जनतेमधून करण्यात येणार आहे. मात्र नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवड निवडून आलेले नगरसेवकच करणार आहेत.

या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रात आणि त्याचबरोबर ज्या जिल्ह्यात चार किंवा त्यापेक्षा जास्त नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असल्यास त्या संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल, असे सहारिया यांनी जाहीर केले.

निवडणूक होणा-या नगरपरिषदा व नगरपंचायतींची नावे

२७ नोव्हेंबर

जिल्हा – पालघर
विक्रमगड (नवीन नगर पंचायत), तलासरी (नवीन न. पं.), मोखाडा (नवीन न.पं.)

जिल्हा – रायगड
खोपोली, उरण, पेण, अलिबाग, मुरूड-जंजिरा, रोहा, श्रीवर्धन, महाड, माथेरान

जिल्हा – रत्नागिरी
चिपळूण, रत्नागिरी, दापोली नगर पंचायत, खेड, राजापूर

जिल्हा – सिंधुदुर्ग
वेंगुर्ले, सावंतवाडी, मालवण, देवगड-जामसांडे (नवीन न. पं.)

जिल्हा – सोलापूर
बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, करमाळा, कुर्डूवाडी, सांगोला, मंगळवेढा, मैंदर्गी, दुधनी.

जिल्हा – कोल्हापूर
इचलकरंजी, जयसिंगपूर, मलकापूर, वडगाव-कसबा, कुरूंदवाड, कागल, मुरगुड, गडहिंग्लज, पन्हाळा.

जिल्हा – सांगली
इस्लामपूर, विटा, आष्टा, तासगाव, कवठे-महाकाळ (नवीन नगर पंचायत.), कडेगाव (नवीन न. पं.), खानापूर (नवीन न.पं.), शिरोळा (नवीन न. पं.), पलूस (नवीन नगर परिषद).

जिल्हा – सातारा
सातारा, फलटण, कराड, वाई, म्हसवड, रहिमतपूर, महाबळेश्वर, पाचगणी, कोरेगाव (नवीन न. पं.), मेढा (नवीन न. पं.), पाटण (नवीन न. पं.), वडूज (नवीन न. पं.), खंडाळा (नवीन न. पं.), दहिवडी (नवीन न. पं.).

जिल्हा – नाशिक
मनमाड, सिन्नर, येवला, सटाणा, नांदगाव, भगूर.

जिल्हा – अहमदनगर
संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, शिर्डी, रहाता, पाथर्डी, राहुरी, देवळाली प्रवरा.

जिल्हा – नंदुरबार
शहादा.

जिल्हा – धुळे
शिरपूर-वरवाडे, दोंडाईचा-वरवाडे.

जिल्हा – जळगाव
भुसावळ, चोपडा, अंमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, यावल, फैजपूर, सावदा, रावेर, एरंडोल, धरणगाव, पारोळा, बोदवड (नवीन न. पं.).

जिल्हा – जालना
जालना, भोकरदन, अंबड, परतूर.

जिल्हा – परभणी
गंगाखेड, सेलू, जिंतूर, मानवत, पाथरी, सोनपेठ व पूर्णा.

जिल्हा – हिंगोली
हिंगोली, बसमतनगर, कळमनुरी.

जिल्हा – बीड
बीड, माजलगाव, परळी-वैजनाथ, अंबेजोगाई, गेवराई, धारूर.

जिल्हा – उस्मानाबाद
उस्मानाबाद, परांडा, भूम, कळंब, तुळजापूर, नळदुर्ग, मुरूम, उमरगा.

१४ डिसेंबर

जिल्हा – पुणे
बारामती, लोणावळा, दौड, तळेगाव-दाभाडे, आळंदी, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, सासवड, शिरूर.

जिल्हा – लातूर
उदगीर, औसा, निलंगा, अहमदपूर.

१८ डिसेंबर

जिल्हा – औरंगाबाद
वैजापूर, कन्नड, पैठण, गंगापूर, खुल्ताबाद.

जिल्हा – नांदेड
धर्माबाद, उमरी, हदगाव, मुखेड, बिलोली, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, देगलूर, अर्धापूर (न. पं.), माहूर (न. पं.).

जिल्हा – भंडारा
पवनी, भंडारा, तुमसर, साकोली (नवीन न. पं.)

जिल्हा – गडचिरोली
गडचिरोली, देसाईगंज

८ जानेवारी २०१७

जिल्हा – नागपूर
कामटी, उमरेड, काटोल, कळमेश्वर, मोहपा, रामटेक, नरखेड, खापा, सावनेर.

जिल्हा – गोंदिया
तिरोरा, गोंदिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *