बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी संकेतस्थळ

बालकांवर होणा-या अत्याचारांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने बालकांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अत्याचाराला बळी पडलेली मुले नराश्येच्या गत्रेत जातात. तसेच याबाबत तक्रार कोठे करावयाची याचीही माहिती नसते. ही अडचण लक्षात घेऊन राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने मुलांवर होत असलेल्या तक्रारीसाठी आपल्या संकेतस्थळावर ‘पोस्को ई-बॉक्स’ तयार केला असून, त्यावर तक्रार नोंदवता येते.

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने शाळेतील मुलांवरील होणा-या मारहाण, लैंगिक छळ, दहशत इत्यादी स्वरूपाच्या तक्रारी सादर करण्यासाठी हा ‘पोस्को ई-बॉक्स’ तयार केला आहे.

मुलांचे संरक्षण करणारा लैंगिक अत्याचार गुन्हा विरोधी कायदा-२०१२ आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या संकेतस्थळावर ‘होम पेज’वर हा ‘पोस्को ई-बॉक्स’ आहे. शाळेत, शाळेच्या आवारात तसेच स्कुलबसमधून प्रवास करताना दुर्दैवाने अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी जाणीव, प्रसार आणि जागृती करण्यासाठी सर्व शाळांनी याबाबत पुढाकार घेऊन मुलांना या संकेतस्थळांची माहिती करून देणे बंधनकारक राहणार आहे. शाळा प्रशासन, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी शाळेच्या दर्शनी भागावर याबाबत माहिती लावली जावी, असे शालेय शिक्षण विभागाने म्हटले आहे.

या संकेतस्थळावर तक्रार करा

www.ncpcr.gov.in या संकेतस्थळावर POCSO e- BOX हा बॉक्स तयार केला आहे. या ठिकाणी थेट तक्रारमुलांना करता येईल.

त्यासाठी पालक, शिक्षक यांनी मुलांना संगणक साक्षर तसेच या संकेतस्थळाविषयी माहिती करून देणे शाळांना बंधनकारक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *