आयफोन ७ घेताय ? मग जाणून घ्या हे तोटे

अॅपलचे लोकप्रिय उत्पादन असलेल्या आयफोन ७ चे मागच्या महिन्यात जोरदार लाँचिग झाले. दर्जाच्या बाबतीत आयफोन अव्वल असल्याने वापरकर्त्यांना आयफोन ७ आणि ७ प्लसकडून भरपूर अपेक्षा होत्या. पण आयफोन ७ आणि ७ प्लसकडून या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. म्हणावे तसे नावीन्यपूर्ण, क्रांतीकारी तंत्रज्ञान आयफोन ७ आणि ७ प्लसमध्ये नसल्याचे वापरकर्त्यांचे म्हणणे आहे.
– आयफोन ७ आणि ७ प्लस बद्दल पहिली तक्रार किंमतीपासूनच सुरुवात होते.  32 जीबीच्या आयफोन 7 ची किंमत जवळपास 53 हजार रुपये आहे. तर 64 जीबीच्या आयफोन 7 ची किंमत जवळपास 61 हजार रुपये आणि 256 जीबीच्या आयफोनची किंमत 71 हजार रुपयांच्या जवळपास आहे. त्याचसोबत 32 जीबीच्या आयफोन 7 प्लसची किंमत 61 हजार रुपये, 128 जीबीच्या आयफोन 7 प्लसची 69 हजार आणि 256 जीबीच्या आयफोन 7 प्लसची किंमत 79 हजार रुपयांच्या जवळपास आहे.
–  अँड्राॅईड फोनशी आयफोनची तुलना केली तर, अँड्राॅईड वापरकर्त्यांना जास्त फायदे मिळतात. आधीच्या आयफोनशी तुलना करता ७ मध्ये फारसे काही नवीन नाही.
– आयफोन ७ मध्ये IOS 10 सिस्टीम आहे,  ते IOS 9 चे अपडेटेड व्हर्जन आहे. त्यामुळे मोबाईलला फारसा फायदा होत नाही.
– आयफोन ७ विकत घेणा-या अनेकांनी सिग्नल ड्रॉप आणि जीपीएस व्यवस्थित चालत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत.
– गुगल मॅप वापरताना नो सिग्नल आयकॉन दिसत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे,.
-आयफोन ७ मध्ये जे नवे फिचर्स आहेत त्याला जास्तीत जास्त बॅटरी लागणार आहे. त्यामुळे भविष्यात बॅटरीची समस्या देखील उदभवू शकते. आयफोन ७ ची बॅटरी आयफोन ६ च्या तुलनेत एक ते दोन तासच जास्त चालू शकते.
– आयफोन ७ च्या रॅममध्ये कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही, आयफोन ६ एस प्रमाणेच २ जीबी रॅम देण्यात आली आहे.
– अॅपलने नव्या आयफोन ७ मध्ये वायरलेस इअरपॅडसचा वापर केला आहे. या इअरपॅडसच्या चोरी होण्याची शक्यता अधिक आहे.
 – तुम्ही तुमच्या संगणकावरुन गाणी, फिल्म, व्हिडीओ तुमच्या मोबाईलमध्ये Transfer  करु शकता. पण आयफोनमध्ये सुलभतेने हे Transfer करता येत नाही. त्यासाठी आय टयुन्स सॉफ्टवेअर तुमच्या संगणकावर असणे आवश्यक आहे.
 – सध्याचे बहुतेक मोबाईल डयुअल सीम आहेत. पण आयफोन अजूनही सिंगल सीम आहे. त्यामुळे काही आयफोन युझर्सना दुसरा फोनही सोबत कॅरी करावा लागतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *