भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना मुस्लिम शिक्षक योगाचे शिक्षण देत आहेत. जगभरातील विविध देशांमध्ये आंतरराष्ट्रीय (21 जून) योग दिन साजरा करण्यात येणार आहे.
येथील मोईनुल हक स्टेडियममध्ये शहा यांना मोहम्मद तमन्ना व अशोक सरकार हे योगाचे प्रशिक्षण देत आहेत, अशी माहिती बिहार-झारखंडमधील काम पाहणारे पतंजली योगपिठाचे अजित कुमार यांनी आज (बुधवार) दिली.
अजित कुमार म्हणाले, ‘तमन्ना या शहा यांना योगाच्या काही महत्त्वपूर्ण टिप्स देत आहेत. रविशंकर प्रसाद, राजीव प्रताप रुडी, राधा मोहन सिंग व रामकृपाल यादव यांच्यासह केंद्रीय मंत्री योगाचे शिक्षण घेण्यासाठी येथे येत आहेत.

