पाकणीजवळ भीषण अपघात; चार जण जागीच ठार

सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात चार जण ठार झाले आहेत.

पाकणी गावाजवळ हा अपघात झाला. बोलेरो आणि कंटेनर यांच्यात धडक होऊन ही दुर्घटना घडली.

या अपघातात मृत्यू पावलेले सर्वजण एकाच कुटुंबातले आहेत.

दुर्दैव म्हणजे, उपचारासाठी ते रुग्णालयात चालले होते. मात्र त्याआधीच त्यांच्यावर काळानं घाला घातला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *