गुमास्ता कामगार आजपासून संपावर?

मुंबईकरांच्या पसंतीच्या आणि सर्वाधिक उलाढाल करणाऱ्या दक्षिण मुंबईतील सी वॉर्डमधील मुळजी जेठा मार्केट, मंगलदास मार्केट, स्वदेशी मार्केट, काकड मार्केट आणि हनुमान गल्लीतील कपड्याच्या पाच प्रमुख बाजारपेठा शुक्रवार व शनिवारी बंद राहण्याची शक्यता आहे. कारण दुकानांमध्ये गिऱ्हाईकांची मर्जी सांभाळणाऱ्या गुमास्ता कामगारांच्या संघटनेने दोन दिवसांच्या बंदची हाक दिली आहे. मुंबई गुमास्ता युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बंदची हाक दिली आहे. राव म्हणाले की, ‘पाचही कापड बाजारांत सुमारे २० हजारांहून अधिक गुमास्ता काम करतात. याआधी गेल्या वर्षी २० आॅक्टोबरला एक दिवसाचा संप झाला होता.

सर्वच कपडा बाजारांत नवीन गुमास्तांना पाच हजार, तर २० वर्षांहून अधिक सेवा केलेल्या गुमास्तांना १० ते १२ हजार रुपये वेतनावर राबवून घेतले जाते. सध्या कामगारांना १ हजार ३७५ रुपये बेसिक मिळत आहे. ते कमी असूून, शासकीय नियमांनुसार वेतन देण्याची मागणी युनियनचे संपतराव चोरगे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *