मिका क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय हवाई दलाने शनिवारी हवेतून हवेत मारा करणा-या ‘मिका’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हे क्षेपणास्त्र ‘मिराज-२०००’ या आधुनिकीकरण केलेल्या विमानातून डागले.

संरक्षण खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विमानापेक्षा आकाराने लहान ‘लक्ष्या’चा या क्षेपणास्त्राने अचूक भेद केला. यामुळे ही चाचणी यशस्वी झाली.

हवेतून हवेत मारा करणा-या बीव्हीआर पल्ल्याची क्षमता असलेल्या मोजक्या देशात भारताचा समावेश झाला. या चाचणीमुळे हवाई दलाची क्षमता पुन्हा सिद्ध झाली आहे.

भारताने युरोपातील ‘एमबीडीए’ कंपनीकडून ४५० क्षेपणास्त्र खरेदी केली आहेत. ‘मिराज २०००’ या विमानाच्या आधुनिकीकरण करारात हा क्षेपणास्त्र खरेदी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *