पीएफ गहाण ठेवून करा घराचे स्वप्न पूर्ण

कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) चार कोटींहून अधिक सदस्यांना आता पीएफ गहाण ठेवून स्वस्त घर योजनेत घर खरेदी करून ईपीएफ खात्यातून दरमहा गृहकर्जाचा हप्ताही चुकता करता येणार आहे. आगामी वित्तीय वर्षापासून ही योजना सुरू होण्याची शक्यता आहे.

कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या सदस्यांसाठी गृह योजनेवर आम्ही काम करीत आहोत. मार्चअखेर आॅनलाईन पीएफ काढण्याची सेवा सुरू करण्यात आल्यानंतर २०१७-१८ मध्ये गृहयोजना सुरू केली जाईल, असे ईपीएफओचे केंद्रीय भविष्य निधी आयुक्त व्ही.पी. जॉय यांनी सांगितले.

या गृह योजनेमुळे ईपीएफओच्या सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांना आपला पीएफ गहाण ठेवून घर खरेदी करता येईल, तसेच ईपीएफ खात्यातून गृहकर्जाचा मासिक हप्ताही चुकता करता येईल, असे जॉय यांनी सांगितले. या योजनेहत ईपीएफओ मदतनीस म्हणून काम करणार आहे. जेणेकरून ईपीएफ सदस्यांना सेवाकाळात घर खरेदी करणे सोयीचे होईल. तथापि, जमीन खरेदी करण्याचा किं वा ईपीएफ सदस्यांसाठी घरे बांधण्याचा ईपीएफओचा बेत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *