गोवा : चटई क्षेत्राप्रमाणे कर लागू करावा.

चटई क्षेत्र लागू नसलेल्या बंधकामासाठी अनेकजण 15ते20टक्के जास्त कर चौथरा करानुसार पालिकेला भरत आहेत. मात्र, वसुली अधिकारी त्यांना विविध धमक्या देऊन त्यांचा छळ करीत आहेत. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी पालिकेजवळ येत आहेत. त्यामुळे पालिकेने एक तर सर्वांसाठी चटई क्षेत्राप्रमाणे कर लागू करावा किंवा वसुलीसाठीच्या धमक्या  थांबवा. अन्यथा न्यायालयाचा दरवाजा ठोठवणार, असा इशारा शॅडो मंडळाच सावियो कुतिन्हो यांनी दिला आहे.

मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शॅडो मंडळाचे सावियो कुतिन्हो, अगस्तीनो,   जॉन फर्नांडिस, हेमंत, टॉमी, व इतर उपस्थित होते.

सावियो कुतिन्हो म्हणाले, की 1198 ते 2002 सालापर्यंत मडगाव नगरपालिका क्षेत्रातील बंधकामांचे सर्वेक्षण झाले होते. ज्याप्रमाणे 9403 बांधकामांना चौथरा क्षेत्राप्रमाणे कर लागू करण्यात आला होता. हे सर्वेक्षण 2002 सालापर्यंत चालले. मात्र, 2002 मध्ये एका बांधकाम व्यावसायिकाच्या मागणीवरून केवळ त्यालाच्या चटई क्षेत्राचा कर लागू करण्यात आला.  त्यावर आपण आवाज उठवला नंतर  2002च्या बंधकामांना चटई क्षेत्राप्रमाणेच कर लागू करावा लागला. चटई आणि चौथरा क्षेत्रात फरक असून चटई क्षेत्राच्या तुलनेत चौथरा क्षेत्राचा कर 15 ते 20 टक्क्याने जास्त आहे. 2002 च्या या सर्वेक्षणांनंतर काही मोजक्याच बांधकामांना चौथरा क्षेत्र लागू करून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे. या लोकांकडून जास्त कर वसूल केला जात आहे, असे कुतिन्हो म्हणाले.

सर्व बांधकामांना चटई क्षेत्र लागू व्हावे चौथरा क्षेत्र असलेल्यांवर अन्याय करू नये. चौथरा क्षेत्र लागू असलेले  अतिरिक्त कर पालिकेला भरत आहे. चौथरा क्षेत्र लागू असणार्‍यावर अन्याय झाल्यास न्यायालयाचे दार ठोठावणार, असा इशारा कुतिन्हो यांनी दिला आहे.

अगस्तीनो यांनी सांगितले, की मडागावच्या नागराध्यक्षा बबिता आंगले प्रभुदेसाई यांनी जी आलिशान  इनोव्हा गाडी घेतली होती. त्या गाडीची किंमत साडे सोळा लाख होती. ती गाडी आता परत करण्यात आली आहे, असे सांगण्यात येते. मात्र, अजून काही ती रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा झालेली नाही.  नागराध्यक्षांनी गाडी परत केलेली नसेल तर ती करावी.  ती रक्कम पुन्हा कायदेशीर  पुराव्यासह नगरपालिकेच्या तिजोरीत जमा करावी. यामध्ये पारदर्शकता असण्याची गरज आहे. हा नागरिकांचा पैसा आहे. या पैशांचा वापर कुठे व कसा होतो याची सर्व माहिती नागरिकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. पालिकेने पुराव्यासह याची नोंद लवकरात लवकर करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *