पंजाब : १५ लाख नागरिकांची सुरक्षित स्थळी रवानगी

भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल ॲक्शन घेतल्यानंतर पंजाब राज्यातील पाकिस्तानच्या सीमेवर लागून असलेल्या एक हजार गावांतील १५ लाख नागरिकांनी सुरक्षित स्थळी पाठवण्यात येत आहे. या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नातेवाईकांच्या घरी जाण्यास सांगितले आहे. ज्यांच्याकडे ही व्यवस्था नाही त्यांच्यासाठी शाळांमधून कँप सुरू करण्यात आल आहेत.
पाकिस्तानने काही प्रत्युत्तर दिले तर नागरिकांना हानी पोहचू नये यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे. अमृतसर, गुरुदासपूर, पठाणकोठ, फिजिलक्का, फिरोजेपूर, त्रण तरण या जिल्ह्यातील गावांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. गावांतील नागरिकांच्या मालमत्तेची संपूर्ण जबाबदारी पोलिसांवर असून या गावांत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विविध पक्षांचे कार्यकर्ते नागरिकांना सुरक्षित जाण्यासाठी सहकार्य करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *