हम नही सुधरेंगे ! पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरुच आहेत.  गुरुवारी मध्यरात्री पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. जम्मूतील अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. गुरुवारी मध्यरात्री 12.30 ते 1.30च्या सुमारास हा गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला भारतीय सैन्यांनी चोख प्रत्युत्तर दिले.
भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून हालचाली सुरू झाल्याचं दिसत आहे. सीमेवर पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली वाढल्या असून काही भागांमध्ये पाकिस्तानी रेंजर्स दिसल्याचं कळत आहे. जसजशी वेळ सरकत आहे तसतसा तणाव वाढत चालला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *