हातावर लिहून तिने दिली बलात्कार झाल्याची माहिती

जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयामधील एका खोलीत तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणीने तक्रार करुनही पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. अखेर प्रसारमाध्यमांनी ही घटना समोर आणल्यानंतर पोलिसांनी तीन दिवसांनंतर सोमवारी घटनेची दखल घेतली. बलात्कारानंतर पीडित तरुणीला बोलणंही शक्य होत नव्हतं. त्यामुळे तिने हातावर लिहून आपल्यावर झालेल्या बलात्काराची माहिती पोलिसांना दिली.
पीडित तरुणी रायबरेलीची असून मुंबईत एका कॉल सेंटरमध्ये काम करते. एका खटल्याच्या निमित्ताने तिला नेहमी फतेहपूरला यावं लागायचं. वकिल जय सिंह याने काही दिवसांपूर्वी तिला हॉटेलमध्ये बोलावून गुंगीचं औषध दिलं, आणि आरोपी मित्र पियुषच्या सहाय्याने सामूहिक बलात्कार केला असा आरोप करण्यात आला आहे.
तरुणीची तब्बेत बिघडल्यानंतर त्यांनीच तिला सरकारी रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्यानंतरही त्यांनी रुग्णालयातील खोलीत तिच्यावर बलात्कार केला. विरोध केला असता तिला मारहाणही करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस अधिकारी राजकमल यादव यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *