ऐतिहासिक कसोटी भारताने जिंकली, किवींचा धुव्वा

कानपूरच्या ऐतिहासिक कसोटीत टीम इंडियानं न्यूझीलंडचा 197 धावांनी धुव्वा उडवला. न्यूझीलंडवरच्या या विजयामुळं टीम इंडियानं कसोटीच्या जागतिक क्रमवारीत पाकिस्तानसोबत संयुक्तरित्या अव्वल स्थान गाठलं आहे.

भारत आणि पाकिस्तानच्या खात्यात आता प्रत्येकी 111 गुण जमा झाले आहेत.

या सामन्यात भारतानं न्यूझीलंडला विजयासाठी 434 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 236 धावांवरच आटोपला.

भारताकडून अश्विननं सहा, शमीनं दोन तर जाडेजानं एक विकेट काढली.

न्यूझीलंडसाठी ल्यूक रॉन्कीनं 80 आणि मिचेल सॅन्टनरनं 71 धावांची खेळी रचली. भारतानं पहिल्या डावात 318, तर न्यूझीलंडनं 262 धावा केल्या होत्या. मग भारतानं आपला दुसरा डाव 377 धावांवर घोषित करुन किवींसमोर 434 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूूझीलंडचा दुसरा डाव 236 धावांवर आटोपला.

*****************************************************

कानपूर: कानपूरच्या ऐतिहासिक कसोटीत टीम इंडिया विजयापासून केवळ एक विकेट्स दूर आहे. न्यूझीलंडचे नऊ फलंदाज तंबूत परतले आहेत.

मोहम्मद शमीनं सलग दोन चेंडूत बीजे वॉटलिंग आणि मार्क क्रेगला माघारी धाडलं.

त्याआधी ल्यूक रॉन्कीनं 120 चेंडूंत 80 धावांची खेळी केली. रॉन्कीनं मिचेल सॅन्टनरच्या साथीनं पाचव्या विकेटसाठी 102 धावांची मजबूत भागीदारी रचली.

कानपूरमध्ये न्यूझीलंडला हरवलं तर कसोटीच्या जागतिक क्रमवारीत भारत पाकिस्तानसोबत संयुक्तरित्या अव्वल स्थान गाठेल.

भारताच्या फिरकीसमोर न्यूझीलंड फलंदाज ढेपाळले

या सामन्यात भारतानं न्यूझीलंडला विजयासाठी 434 धावांचं आव्हान दिलं. रवीचंद्रन अश्विनच्या फिरकी माऱ्यासमोर किवी टीमची अवस्था चौथ्या दिवसअखेर 4 बाद 93 अशी बिकट झाली होती.

त्यामुळे कानपूर कसोटीवर भारताची पकड मजबूत झाली . चौथ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा ल्यूक रॉन्की 38 आणि मिचेल सॅन्टनर 8 धावांवर खेळत होता.

टीम इंडियानं दुसरा डाव 5 बाद 377 धावांवर घोषित केला होता. भारताकडून चेतेश्वर पुजारानं 78 तर मुरली विजयनं 76 धावा केल्या. रोहित शर्मानं नाबाद 68 आणि रविंद्र जाडेजानं नाबाद 50 धावांची खेळी केली. अजिंक्य रहाणेनंही 40 धावा केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *