राज्यात वाहनांच्या मराठी नंबरप्लेटला लवकरच परवानगी

महाराष्ट्रात आता वाहनांवर मराठी नंबरप्लेट लावण्याचा मार्ग लवकरच खुला होणार आहे. केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री यांनी नितीन गडकरी यांनी याबद्दलचे संकेत दिले आहेत. त्यानुसार आता महाराष्ट्राच्या हद्दीत वाहनांवर मराठीत नंबरप्लेट लावता येईल. ं या प्रस्तावाला गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते.
सध्या केंद्रीय मोटर वाहन कायदा १९८९ च्या ५० व्या कलमाप्रमाणे सर्व वाहनांच्या नंबरप्लेट इंग्रजी भाषेतच असणे बंधनकारक आहे. त्यामुळे रोमन आकड्यांशिवाय अन्य कोणत्याही भाषेतील नंबरप्लेट अवैध मानल्या जातात. वाहतूक पोलिसांकडून अनेकदा अशा नंबरप्लेट वापरणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाईही करण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील वाहनचालकांकडून अशाप्रकारच्या फॅन्सी आणि अन्य भाषेतील नंबरप्लेटसचा सर्रासपणे वापर होताना दिसतो. इंग्रजी क्रमांकांना मराठी अक्षरामध्ये स्वरुप देऊन अफलातून कल्पना लढवून नाना, बॉस, दादा, राज, बाबा अशी विशेषणे लावून आपल्याला गाडीची विशिष्ट ओळख करुन देण्याचे प्रकार अनेकदा पाहायला मिळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *