आसाराम भक्तांचा विमानात दंगा…..

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांना वैेद्यकीय तपासणीसाठी विमानातून दिल्लीत आणले जात असताना त्या विमानात त्यांच्या भक्तांनी दंगा केल्याची खळबळजनक घटना घडली. बापूंच्या पाया पडण्यासाठी भक्तांनी विमानातच धावाधाव सुरू केली. यामुळे विमान हवेतच हेलकावे खाऊ लागले. पण वेळीच प्रसंगावधान ओळखून क्रू मेंबर्सनी या भाविकांना आवर घातला. यामुळे मोठा अनर्थ टळला.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गेल्या तीन वर्षापासून आसाराम बापू तुरुंगात आहेत. त्यांची तब्येत बरी नसल्याने नुकतेच त्याना वैद्यकिय तपासणीसाठी जोधपुरहून विमानाने दिल्लीला आणण्यात आले. या विमानातील ७० पैकी ३५ आसन आसारामच्या भक्तांनी आधीच बुक केली होती. विमानाने उडाण्ण करताच सर्व भक्तांनी बापूच्या पाया पडण्यासाठी धावाधाव सुरू केली. यामुळे विमानाचा बॅलन्स बिघडला आणि ते हवेत हेलकावे खाऊ लागले. यामुळे हवालदिल झालेल्या वैमानिकाने भक्तांना तातडीने शांत राहाण्याच्या सीटवर बसण्याच्या सूचना केल्या पण साक्षात बापू आपल्या सोबत असताना कुठलाच अनर्थ होऊ शकत नाही असा विश्‍वास भाविकांनी व्यक्त करत दंगा सुरूच ठेवला होता. शेवटी सगळयांच क्रू मेंबर्सनी भक्तांना शांत राहण्याच्या सूचना वजा दम दिला त्यांनतर सगळे शांत झाले. दरम्यान बापूच भक्तांना चिथावणी देत होता असा आरोप पोलिसांनी केला आहे.

     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *