जेव्हा युवराजने लगावले होते एका ओव्हरमध्ये ६ सिक्स

भारताचा धडाकेबाज क्रिकेटर युवराज सिंगने त्याच्या करिअरमध्ये अनेक अशा इंनिग खेळल्या आहेत ज्या नेहमी लक्षात राहतील. पण १९ सप्टेंबर २००७ हा दिवस संपूर्ण क्रिकेट विश्वाला लक्षात असेल. हाच तो दिवस ज्या दिवशी डरबनच्या मैदानावर युवराजने इंग्लंडचा फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉडला एका ओव्हरमध्ये ६ सिक्स लगावले होते आणि क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहावा असा पराक्रम करुन दाखवला होता.

२००७ मध्ये दक्षिण अफ्रिकेत खेळल्या गेलेल्या पहिल्या टी२० वर्ल्डकपमध्ये युवराजने ही शानदार खेळी केली होती. युवराज आणि फ्लिंटॉफ यांच्यामध्ये त्याआधी थोडी बाचाबाची झाली होती. त्यानंतर युवराजला इतका राग आला की त्याने एका ओव्हरमध्ये ६ छक्के लगावले होते.

क्रिकेट इतिहास हे चौथ्यांदा झालं होतं पण एका ओव्हरमध्ये ६ सिक्स हे टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडलं. भारताने या मॅचमध्ये २१८ रन्स केले होते. युवराजने १४ बॉलमध्ये ५८ रन केले होते. इंग्लंडचा या मॅचमध्ये १८ रनने पराभव झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *