मुंबईत घोंघावतंय डेंग्यूचे वादळ

डेंग्यूला कारणीभूत ठरणा-या ‘एडिस इजिप्ती’ डासांच्या उत्पतीला सध्या पोषक वातावरण असल्यानं मुंबईत डेंग्यूचे वादळ घोंघावतंय. आतापर्यंत मुंबईत डेंग्यूमुळं दोघांचा मृत्यू झालाय. तर रूग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसतंय.

पावसाळा संपत आला की दरवर्षी मुंबईला डेंग्यूंचा सामना करावा लागतो. यावर्षीही डेंग्यूनं हजेरी लावली आहे. सप्टेंबर महिन्यात 122 जणांना डेंग्यू झालाय. तर 1573 जण डेंग्यूचंसंशयित रूग्ण आढळलेत. मुंबईत 2016 मध्ये आतापर्यंत 398 जणांना डेंग्यूची लागण झालीय.

ही केवळ पालिका रूग्णालयांतील आकडेवारी असून खाजगी रुग्णालयांमधील आकडेवारी यापेक्षा अधिक असू शकते. मुंबई महापालिकेनं केलेल्या तपासणीत झोपडपट्टी परिसरात ‘एडिस इजिप्ती’ डासांची १,८२८ तर इमारतींच्या परिसरात ७,११८ उत्पत्तीस्थाने आढळून आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *