मुरुडच्या किनाऱ्यावर आढळला मृत व्हेल मासा

मुरुडच्या किनाऱ्यावर आढळला मृत व्हेल मासा

दापोली तालुक्यातील मुरूड समुद्रकिनारी ३० फुटी मृत व्हेल मासा आढळला आहे.

अत्यंत कुजलेल्या स्थितीत हा मासा मुरुड समुद्र किनारी लागला आहे. सकाळी किनारी पर्यटक फिरत असताना हा मासा पर्यटकाना आढळला. त्यांनी स्थानिक नागरिकांना याची माहिती दिली.

चार दिवसांपूर्वी असाच एक जिवंत ब्लू व्हेल मासा मडबन किनारी आढळला होता. त्यावेळी वन विभागानं त्या मशाला जीवदान दिलं होतं.

खोल समुद्रात रहणारे हे मासे गेल्या कही वर्षात कोकणच्या किनारपट्टी भागात आढळू लागलेत. गेल्या काही महिन्यांमध्ये हा चौथा व्हेल मासा किनाऱ्यावर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *