मुंबईत गणेश विसर्जनाच्यावेळी फ्रान्सप्रमाणे ट्रक हल्ला होण्याची भीती

पोलिसांनी उद्याच्या गणेशोत्सव विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर एक खबरदारीचा अलर्ट जारी केला आहे. फ्रान्सप्रमाणे ट्रक हल्ला होण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.

फ्रान्समध्ये 14 जुलैला झालेल्या ट्रक हल्ल्यात 84 लोकांचे बळी गेले होते. गणेश विसर्जनाला मुंबईच्या रस्त्यावर लाखोंची गर्दी जमलेली असते. त्यामुळं फ्रान्सच्या धर्तीवर मुंबईतही ट्रक हल्ला होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबईत जवळपास 11 हजार मंडळे ट्रक किंवा टेम्पोमधून गणेश विसर्जन करतात. त्यामुळे ट्रक आणि टेम्पो चालकांवर पोलिसांची खास नजर असणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांसाठी खास सूचना दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *