मराठा मूक मोर्चा : मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थतीचा आढावा

राज्यभर सुरु असलेल्या मराठा मूक मोर्चासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आमदार, खासदार आणि मराठा नेत्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातल्या सर्व मूक मोर्चांच्या परिस्थतीचाही आढावा घेतला.

दरम्यान, या भेटीबाबत मराठा नेते समाधानी असून सर्वांनी केलेल्या मागण्या यावर सरकार सहमत आहे असं सांगत प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी सरकारच्यावतीने पक्षाची भूमिका जाहीर केली. मुख्यमंत्र्यांनी मोर्चा काढणाऱ्यांचे अभिनंदन केले. ज्या काही मागण्या आहेत, त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शविली अशी माहिती प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *