डोंबिवलीत तरूणीची चोराशी झटापट, तरूणीवर वार

डोंबिवलीत एका २० वर्षीय तरूणीने चोरीला विरोध करताना, चोराशी १० मिनिटं झटापट केली.

अखेर चोराने तिच्याकडील पर्स खेचून, रागात तिच्यावर ब्लेडने वार केले. यात ही तरूणी जखमी झाली आहे. मात्र या तरूणीने चोराशी दिलेल्या लढ्याबाबत तिचं कौतुक होत आहे.

मॉडेल कॉलेजजवळ ही घटना घडली, ही तरूणी कॉलेजमधून घरी जात असताना, सोनसाखळी चोराने या तरूणीला लुटण्याचा प्रयत्न केला, पण या तरूणीने याचा जोरदार विरोध केला.

निर्जन रस्त्यावर या तरूणीची आणि चोराची १० मिनिटे झटापट झाली. याबाबतीत टिळक नगर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कल्याण-डोंबिवलीत लुटा-लुटीच्या घटना वाढल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *