हा बाप की हैवाण, गृहपाठ करत नाही म्हणून…

पित्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना मध्यप्रदेशात घडलीय.

मुलगी गृहपाठ करत नाही म्हणून तिला सिगारेटचे चटके देणाऱ्या नराधम बापाला अटक करण्यात आलीय.

जबर मारहाण

नराधम आपल्या पाच वर्षांच्या मुलीला मारहाणही करत असे… मुलीनं सांगितल्यानुसार एकदा तर तिला लाकडी दांड्यानं इतकी मारहाण करण्यात आली की तो दांडा मोडला…

आईचाही मारहाणीला पाठिंबाच

धक्कादायक बाब म्हणजे मुलीची आईदेखील या मारहाणीमध्ये बापाला सामील होती. एमआयजी परीक्षेत्रात देवनगर इथं हा संतापजनक प्रकार एका सामाजिक संस्थेच्या सजगतेमुळे उघडकीस आला.

‘चाईल्ड लाईन’ची मदत

एका घरातून एका लहान मुलीच्या ओरडण्याचा-रडण्याचा आवाज येत असल्याचं लक्षात आल्यानंतर ‘चाईल्ड लाईन’ या संस्थेचे कार्यकर्ते पोलिसांना घेऊन तिथं पोहोचले… त्यानंतर ही बाब उघडीस आलीय. पीडित मुलगी सध्या या संस्थेसोबत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *