अंबानी बंधुमध्ये चढाओढ, रिलायन्स आणली जबरदस्त ऑफर

भारतीय टेलीकॉम मार्केटमध्ये रिलायंस जियोच्या एन्ट्रीनंतर मोबाईल डेटाच्या किंमतीवरुन मोठी स्पर्धा सुरु झाली आहे. टेलीकॉम कंपन्या मार्केटमध्ये आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी एकापेक्षा एक ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुकेश अंबानी यांच्या रिलायंस जियो इंफोकॉमला टक्कर देण्यासाठी भाऊ अनिल अंबानी देखील मैदानात उतरले आहेत.

आरकॉम म्हणजेच रिलायन्स कम्युनिकेशन एक शानदार आणि स्वस्त ऑफर जाहीर केली आहे. रिलायंस कम्यूनिकेशन आपल्या प्रीपेड जीएसएम यूजर्ससाठी एक विशेष ऑफर दिली आहे. ४० रुपायांच्या रिचार्जमध्ये ४० रुपये फुल टॉकटाइम आणि 1 जीबी इंटरनेट डाटा देखील कंपनी फ्रीमध्ये देत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *