‘बिग बॉस’मध्ये घुमणार महिलेचा आवाज! तृप्ती देसाई होणार सहभागी?

महिलांच्या मंदिर प्रवेशासाठी लढा देणा-या ‘भूमाता ब्रिगेड’च्या तृप्ती देसाई आता प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेल्या ‘ बिग बॉस’चा १० वा सीझन पुढील महिन्यात येणार असून तृप्ती देसाईंना शोमध्ये सहभागी होण्याबाबत विचारणा करण्यात आली आहे. या शोमध्ये नेहमीही सेलिब्रिटी स्पर्धक सहभागी होतात, मात्र यावेळी शोमध्ये सामान्य जनतेलाही सहभागी होता येणार आहे.
आम्ही महिलांच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याची बिग बॉसनेही दखल घेतली असून त्यांनीच मल शोमध्ये सहभागी होण्याबाबत विचारण केली. गेल्या महिन्यात आमची मीटिंगही झाली. मात्र या शोमध्ये सहभागी झाल्यास संपूर्ण ९० दिवस बिग बॉसच्या घरात रहावे लागते, बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क ठेवता येत नाही,  असे मला कळले. मात्र माझ्या आधीच काही कमिटमेंट्स असून त्या तारखा अॅडजस्ट झाल्यास मी शोमध्ये सहभागी होण्याचा विचार करेन, असे मी चॅनेलवाल्यांना सांगितले. मात्र यो शोमध्ये सहभागी होण्यापूर्वी मी त्यांच्यासमोर अट ठेवली आहे. या शोमधील ‘ बिग बॉस’ चा आवाज महिलेचा असावा. गेल्या ९ सीझनपासून एका पुरूषाने ही धुरा सांभाळली आहे, मात्र आता ती जबाबजारी महिलेकडे दिल्यास इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे ‘महिला’ हे क्षेत्रही गाजवतील असा मला विश्वास वाटतो, असे तृप्ती देसाई यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *