इनसॅट थ्री डीआर उपग्रह आज होणार लाँच

हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्याच्या दिशेनं भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आणखी एक महत्वाचा उपग्रह सोडण्याची तयारी पूर्ण केलीय.

आज दुपारी चार वाजून 10 मिनिटांनी इनसॅट थ्री डीआर हा उपग्रह जीएसटव्ही एफ झिरो फाईव्ह या भूस्थिर यानाच्या मदतीनं अवकाशात सोडण्यात येणार आहे.

आंध्रप्रदेशातल्या श्रीहरिकोट्यातल्या सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये काल सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी याचं काऊंडाऊन सुरू झालंय. इनसॅट 3 डीआर हा 2 हजार 211 किलोचा उपग्रह असून त्याची कंट्रोल रुम कर्नाटकातल्या हासन शहरात असेल.

पृथ्वीपासून 110 किलोमीटर उंचीवर हा उपग्रह भूस्थिर कक्षेत स्थापित करण्यासाठी साधारण 17 मिनिटं लागतील अशी माहिती इस्त्रोनं दिलीय.  या उपग्रहाचं आयुष्य 10 वर्ष असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *