आईने पोटच्या दोन लहान मुलींना नदीत फेकले

बिहारमधील बेगूसराय गावात एका आईने दोन लहान मुलींना नदीत फेकून पळ काढला. तेथील मच्छीमारांनी त्या दोन चिमुकल्या मुलींचा जीव वाचवला.

बेगूसराय गावच्या नीमाचांदपूरा या पोलीस स्थानकात या घटनेाचा गुन्हा दाखल झाला आहे.

नीलू देवी असं या आरोपी आईचं नाव असून, अनू कुमारी(4) आणि प्रीती कुमारी(2) या दोन मुलींना नदीत फेकून नीलूने आपल्या प्रियकराबरोबर पळ काढला.

मच्छीमारांनी त्या चिमुकल्यांना सुखरुप वाचवून, पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मनोज शर्मा त्या मुलींच्या आजोबांनी आपली मुलगी नीलू आणि तिचा प्रियकर गोपालवर मुलींची हत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी नीलू आणि तिचा प्रियकर फरार असल्यामूळे पोलिसांनी पूढील शोधकार्य सुरू ठेवलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *