सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ महाराष्ट्रकडून चालू आर्थिक वर्षात 1,315 पदे भरण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी 6 सप्टेंबरपर्यंत इच्छुकांना अर्ज करता येणार आहे.
बॅंकेकडून भरतीसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीत लिपीक पदाच्या 500 जागा भरल्या जाणार आहेत; तर 815 प्रोबेशनरी अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे. “आयबीपीएस‘च्या नियमावलीनुसार लेखी परीक्षा होणार आहे आणि त्यात उत्तीर्ण होणारे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतील. पुढील काही महिन्यांत बॅंकेचा राष्ट्रीय स्तरावर विस्तार केला जाणार आहे. इतर राज्यांत नव्याने शाखा सुरू करण्यात येतील. त्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता लागणार असल्याचे बॅंकेच्या मनुष्यबळ विभागाचे महाव्यवस्थापक मनोज बिस्वाल यांनी सांगितले.
भरती प्रक्रिया ऑनलाईन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. लिपिकांच्या एकूण पदांपैकी 100 पदे कायदेविषयक तज्ज्ञांची आणि 200 पदे कृषी सहायक म्हणून भरली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.