तीन बहिणींवर अ‍ॅसिड फेकून तरुणाची आत्महत्या

तीन बहिणींवर अ‍ॅसिड फेकून तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात सोमवारी घडली. या तिघींपैकी दोघी अल्पवयीन आहेत. पोलीस एकतर्फी प्रेमासह विविध कोनातून या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

तळजा शहरातील रहिवासी सुनील सरवय्या (२०) याने २१, १७ आणि १६ वर्षे वयाच्या तिघींवर कथितरीत्या अ‍ॅसिड फेकले. या मुलींवर भावनगर येथील सर टी हॉस्पिटल येथे उपचार करण्यात येत आहेत.

या तिघी तळोजा शहरातील बाजारपेठेतून जात असताना सुनीलने त्यांना गाठले आणि त्यांच्यावर अ‍ॅसिड फेकले. तिघींनाही फारशी दुखापत झाली नाही. केवळ हाताला थोडेसे भाजले. अ‍ॅसिड फेकल्यानंतर सरवय्या याने जवळच्या तळ्यात उडी मारून आत्महत्या केली, असे पोलीस उपनिरीक्षक पी. एस. रिझवी यांनी सांगितले. सरवय्या शहरातील मोबाईल दुरुस्तीच्या एका दुकानात कामाला होता, असे प्राथमिक पोलीस तपासात समोर आले.

सरवय्यासोबत आणखी एक युवक होता, असा दावा मुलीच्या कुटुंबियांनी केला असून, पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत. सरवय्याचा मृत्यू झाल्यामुळे त्याने हे पाऊल का उचलले याचे कारण लगेचच समजू शकले नाही. एकतर्फी प्रेमासह विविध बाजू आम्ही तपात आहोत. गुन्ह्याच्या वेळी सरवय्यासोबत आणखी कोणी होते काय, याचीही आम्ही चौकशी करीत आहोत, असे रिझवी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *