पंचवीस लेनचा सर्वात रुंद हायवे!

चार पदरी किंवा सहा पदरी हायवे ही आपल्या देशात नवलाईची बाब नाही. मात्र, अमेरिकेतील एक हायवे असा आहे ज्यामध्ये 25 पेक्षाही अधिक लेन आहेत! टेक्सासमधील स्टेट हायवे ‘आयएच-10 केटी फ्रीवे’ हा जगातील सर्वाधिक रुंदीचा हायवे आहे. त्याच्या दोन्ही बाजूस या येण्या-जाण्यासाठीच्या 25 पेक्षा अधिक लेन आहेत. त्यामध्ये 12 मेन, 8 फिडर आणि सहा मॅनेज लेन आहेत.
 या सर्व लेन एकमेकींना इंटरकनेक्टने जोडलेल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांना दुसर्‍या हायवेवर जाण्याची सुविधा मिळते. हा हायवे 133 किलोमीटर लांबीचा आहे. उत्तर ह्यूस्टनमध्ये रुंदी सर्वात जास्त आहे. सर्व लेनसाठी टोल बूथ आहेत. मात्र, कोणत्याही वाहनाला थांबावे लागत नाही. कॅमेर्‍यांच्या सहाय्याने वाहनांच्या नंबर प्लेट डेटाबेसपर्यंत पोहोचतात आणि तेथून मालकापर्यंत टोल तिकीट पाठवले जाते. जर एखादे वाहन संदिग्ध असेल किंवा त्याचा नंबर प्लेट डेटाबेस मिळत नसेल तर हायवे पोलिस अशा वाहनाला अडवतात. आतापर्यंत इतका रुंद आणि सुव्यवस्थित हायवे जगात अन्यत्र कुठेही बनवण्यात आलेला नाही. 1983 मध्ये हा हायवे प्रवासाचा वेळ कमी करणे व ट्रॅफिक जामची समस्या रोखणे या उद्देशाने बनवण्यात आला. 2008 नंतर तो अधिक सुविधाजनक झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *