रिलायन्सची ‘4जी’ जियो क्रांती, सेवा सामान्य ग्राहकांच्या सेवेत

रिलायन्स कंपनीने आपली ‘जियो 4 जी’ सेवा सामान्य ग्राहकांना उपलब्ध केली. याबाबत कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी मुंबईत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही सेवा लॉन्च केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजिटल इंडिया उपक्रमाला ही योजना अर्पण करीत असल्याचे यावेळी मुकेश अंबानी यांनी सांगितले. जियोच्या फोरजी सेवेमुळे ग्राहकांना पूर्णपणे डिजिटल आयुष्य जगण्याचा आनंद मिळेल. संपूर्ण जगात ही सेवा सर्वात स्वस्त असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी रिलायन्स कंपनीतर्फे 4जी सेवेबरोबर स्मार्टफोन्सदेखील सादर करणार आहे. डिजिटल विश्वातील स्पर्धा तीव्र करणाऱ्या जियोनो ग्राहकांसाठी अत्यंत आकर्षक सुविधा सादर केल्या आहेत. कंपनी सध्या 4G सेवेची चाचणी करत असल्याने रिलायन्स LYF ब्रँडच्या स्मार्टफोन्सवर अनलिमिटेड व्हिडिओ कॉलिंग, अनलिमिटेड इंटरनेट, मेसेजेसची सुविधा दिली जाणार आहे. ग्राहकांचे सिमकार्ड सुरु झाल्यानंतर 90 दिवसांसाठी ही सवलत आहे.

काय मिळणार?

  • ग्राहकांना रात्री डेटा फ्री मिळणार
  • अवघ्या 50 रुपयांमध्ये मिळणार एक जीबी डेटा
  • विद्यार्थ्यांना 25 टक्के अतिरिक्त डेटा
  • डिसेंबरपर्यंत डेटा कॉलिंग फ्री
  • सध्याच्या दरांपेक्षा एक दशमांश दर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *