संघाच्या नव्या गणवेशाच्या विक्रीला सुरुवात

संघाच्या नव्या गणवेशाच्या विक्रीला सुरुवात

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नव्या गणवेशाच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. नागपूरच्या संघ मुख्यालयात या गणवेशाची विक्री सुरु झाली आहे. संघाचा गणवेश म्हणून ओळख असलेल्या खाकी हाफ पॅन्टची जागा आता फूल पॅन्टनं घेतली आहे.

संघाच्या या गणवेश विक्रीला सुरुवात झाली असली तरी विजयादशमीला होणाऱ्या कार्यक्रमापासूनच स्वयंसेवकांचा हा नवा अवतार दिसून येईल. मार्च महिन्यामध्ये राजस्थानच्या नागौरमध्ये झालेल्या संघाच्या कार्यक्रमावेळी गणवेश बदलण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *