एअर इंडियाच्या विमानात सापडलं २.५० किलो सोनं

गोवा-दुबई या एअर इंडियाच्या विमानात २.५० किलो सोनं सापडलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सोनं विमानाच्या टॉयलेटमध्ये सापडलं आहे. याची किंमत जवळपास ७० लाख रुपये आहे.

विमान दुबईहून आज गोवा येथे लँड झालं. कस्टमच्या कारवाईत हे सोनं सापडलं. कस्टमच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी ही कारवाई केली पण यामध्ये अजून कोणालाही अटक झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *