स्कॉर्पिन पाणबुडीची कागदपत्रे परदेशातून फुटली

स्कॉर्पिन पाणबुडीशी संबंधित संवेदनशील कागदपत्रे फुटल्याची गंभीर दखल नौदलाने घेतली आहे. या प्रकरणाची फ्रान्स सरकारने व फ्रेंच शस्त्र महासंचालयाने तातडीने चौकशी करावी. तसेच ही कागदपत्रे परदेशातूनच फुटली आहेत, असे नौदलाने स्पष्ट केले.

नौदलाची अंतर्गत प्रक्रिया पाहता सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही. ही कागदपत्रे भारतातून नव्हे तर परदेशातूनच फुटली आहेत, असे नौदलाने स्पष्ट केले.

नौदलाने सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आम्ही फ्रेंच सरकार व फ्रेंच शस्त्रास्त्र महासंचालनालयाकडे केली आहे. तसेच राजनैतिक मार्गाने या अहवालाची सत्यता तपासली जात आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नौदल व संरक्षण खात्याने उच्चस्तरीय समिती नेमली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *