कास्यपदक विजेती साक्षी मलिकचं दिल्लीत जंगी स्वागत

रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीत भारताची कास्यपदक विजेती साक्षी मलिकचं दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आलं. आज पहाटे साक्षीचं दिल्ली विमानतळावर आगमन झालं. त्यावेळी विमातळावर ढोल ताशांच्या गजरात जल्लोषाचं वातावरण होतं.

बेटी बचाव बेटी पढाव आणि बेटी खिलाव असा नवा संदेश साक्षीनं यावेळी दिला. गेल्या 12 वर्षात केलेल्या मेहनतीचं चीज झालं असंही साक्षी मलिकनं यावेळी म्हटलंय. यावेळी साक्षीच्या कुटुंबियांसोबत हरियाणा सरकारचे ज्येष्ठ मंत्री अनिल विज आणि हरियाणा भाजपचे अनेक वरिष्ठ कार्यकर्तेही विमानतळावर उपस्थित होते.  आज सकाळी रोहतकमध्ये  साक्षीचा जाहीर सत्कार करण्यासाठी मुख्यमंत्री मोहनलाल खट्टर स्वतः उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *