मॅचदरम्यान मैदानात कोसळल्याने फुटबॉलपटूचा मृत्यू

मलेशियातील एका फुटबॉल मॅचदरम्यान जमिनीवर कोसळून एका नायजेरियन फुटबॉलपटूचा मृत्यू झाला आहे. डेव्हिड ओनिया असं टी टीम क्लबच्या या दुर्दैवी खेळाडूचं नाव आहे.

सुपर लीगमध्ये खेळणाऱ्या क्लब केलांटनविरोधात झालेल्या मॅचच्या तिसऱ्या मिनिटाला ओनिया मैदानात कोसळला होता.

‘न्यू स्ट्रेट्स टाइम्स’ या स्थानिक वृत्तपत्राच्या माहितीनुसार 30 वर्षीय ओनियाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र स्थानिक वेळेनुसार रात्री 10 वाजून 5 मिनिटांनी त्याने अखेरचा श्वास घेतला.

ओनियाच्या मृत्यूचं वृत्त कळल्यानंतर मॅच तासाभरासाठी थांबवण्यात आली होती. टी टीम क्लबच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ओनियाला रुग्णालयात नेणाऱ्या रुग्णवाहिकेने उशिर केल्याचा आरोप केला आहे. ओनियाला हृदयविकाराचा धक्का बसला होता, चालकाने तत्परता दाखवली असती, तर कदाचित चित्र वेगळं असतं असंही म्हटलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *