कविता राऊतला झिका व्हायरसची लागण?

रिओमधून परतलेल्या तीन धावपटू सुधा सिंग, जैशा आणि कविता राऊत या तिघींना सध्या व्हायरल फिवर झालाय. विशेष म्हणजे सध्या जगभरात थैमान घालणा-या झिका व्हायरसची या तिघींनाही लागण झाल्याची शक्यता आहे. मात्र अजून त्यांना झिका व्हायरसची लागण झाल्याचा अधिकृत अहवाल आलेला नाही.

रिओमधून येतानाच या तीनही धावपटू आजारी पडल्या. या तिघीनी रिओमध्ये एकाच अपार्टमेंटमध्ये राहात होत्या. विशेष म्हणजे या अपार्टमेंटच्या परिसरातच झिका व्हायरसच्या प्रादूर्भावाने धुमाकूळ घातला होता.

या तिघींनाही ताप, डोकेदुखी, घशाला सूज आलेली आहे. तसंच रक्तदाबही कमी झालाय. त्यामुळे डेंग्यू आणि मलेरियासोबतच झिका व्हायरसाच प्रादूर्भाव झालाय का याचीही तपासणी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *