देशाच्या राष्ट्रपतींनाही निर्माण झाला डेंग्यूचा धोका

देशाच्या राष्ट्रपतींनाही डेंग्यूचा धोका निर्माण झालाय. कारण दिल्ली महापालिकेनं राष्ट्रपतीभवनातच डेंग्यूच्या डासांचा प्रादर्भाव झाल्याचा इशारा दिलाय.

दिल्लीतल्या रायसिना हिल आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्याप्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढल्याचं पुढे आलं आहे. गेल्या काही दिवसात या परिसरात डेंग्यूचे 150 रुग्ण आढळले आहेत. येत्या काळात परिस्थिती आणखी गंभीर होऊ नये म्हणून  उत्तर दिल्ली महापालिकेनं त्यासंबंधीचा धोक्याचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *