रिओ ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज पहाटे चारच्या सुमारास सुरू झालेल्या अमेरिकेविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला.
यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला 6-1 असा पराभव झाला होता. तर ब्रिटननेही भारताविरुद्ध बचावातील त्रुटी समोर आणत दणदणीत विजय मिळविला होता. मात्र जपानविरुद्धचा सामना 2-2 असा अनिर्णित राहिला होता. त्यामुळे भारताच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या होत्या. आजच्या सामन्यात भारताला अमेरिकेकडून 3-0 ने पराभव पत्करावा लागला. आता अमेरिकेविरुद्धच्या पराभवामुळे भारताच्या संपूर्ण आशा जरी संपुष्टात आल्या नसल्या तरीही महिला संघ हॉकी स्पर्धेत टिकून राहण्याची शक्यता फारच थोडी आहे.