राजापूरजवळ दोन एसटींची समोरासमोर धडक

राजापूर तालुक्यातील हातिवले गावात दोन एसटींची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातात 1 महिला ठार झाली असून कॉलेजला निघालेले 40 विद्यार्थी जखमी आहेत. या जखमींना राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राजापूरहून आबासाहेब मराठे महाविद्यालयाकडे जाणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने जखमी झाले आहेत.

जुवाठी गावातून राजापूरच्या दिशेने निघालेली एसटी आणि राजापूरहून हातिवले येथील कॉलेजला निघालेली एसटींची हातिवले तिठाजवळ समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी गंभीर होती की एसटी समोरील भाग एकमेकांमध्ये अडकला होता. या अपघातात 1 महिला ठार झाली असून एसटीच्या दोन्ही चालकांना पत्रा कापून बाहेर काढावं लागलं.  एसटीचे दोन्ही चालक हे गंभीररित्या जखमी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *