संजुबाबाच्या काळय़ा कपडय़ांचे गुपित

संजुबाबाच्या काळय़ा कपडय़ांचे गुपित

अभिनेता संजय दत्त आता काळे कपडे परिधान केलेला आढळला, तर ही त्याची नवी फॅशन आहे, असे समजू नका. केवळ ज्योतिषाच्या सल्ल्याने तो आता काळे वस्त्र परिधान करणार आहे. पुण्यातील संजय दत्तचे नेहमीचे ज्योतिषी जितेंद्र पटेल यांनी संजय दत्तला ‘राजकारणात पडू नको, फ्रेंच पद्धतीने दाढी ठेव आणि काळय़ा रंगाचा अधिकाधिक वापर कर’ असा सल्ला दिला आहे.

चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेत्यांचे भविष्य पाहणारे जितेंद्र पटेल वाकडला आले होते, त्यांनीच याबाबतची माहिती पत्रकारांना दिली. संजयशी आपले १० वर्षांपासून आपले संबंध असून त्याच्या वाईट काळातही तो आपला सल्ला घेत होता. तो आता ५७ वर्षांचा झाला आहे. पुण्यात तो आपल्याला भेटून गेला असता, त्याला बऱ्यापैकी गोष्टींचे मार्गदर्शन केल्याचे त्यांनी सांगितले. यापुढील काळात उत्कर्ष व्हावा, असे वाटत असल्यास ‘विल पॉवर’ वाढवावी लागेल, उपासना करावी लागेल. नाव, प्रसिद्धी मिळवण्यासाठी फ्रेंच दाढी ठेवावी लागेल. गाडी, कपडे यासह काळ्या रंगाच्या गोष्टींचा अधिकाधिक वापर करावा लागेल. उजव्या हातात हिरेजडित दागिना घालावा लागेल. चित्रपटाची नावे ठरवताना ‘ए’, ‘एम’, ‘के’, ‘एस’, ‘बी’ ही आद्याक्षरे असली पाहिजेत. इतक्यात राजकारणात जाऊ नको. चित्रपटसृष्टीवर लक्ष केंद्रित कर. ९, १ आणि ७ हे क्रमांक फायदेशीर ठरतील. २०१९ नंतर राजकीय योग असून येत्या दहा वर्षांत सुवर्णकाळ असेल, असे आपण संजयला सांगितल्याचे पटेल यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *