एका 26 वर्षाच्या दलित तरुणाचा गुरुवारी संशयास्पद अवस्थेत तुरुंगात मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बारा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
दरोड्याच्या आरोपाखाली गुरुवारी दुपारी कमल वाल्मिकी नावाच्या दलित तरुणाला त्याच्या एका सहकाऱ्यासह पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान तुरुंगातच या तरुणाचा मृत्यु झाला आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. कमलला मरेपर्यंत मारहाण केल्याचा आरोप करत त्याच्या कुटुंबियांना पोलिस स्थानक प्रमुखाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. दरम्यान पोलिसांनी कमलने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. “योगेंद्र सिंह या पोलिस स्थानक प्रमुखासह एकूण 12 पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. जर पोलिस कर्मचारी दोषी आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल‘, अशी माहिती मथुरेतील वरिष्ठ पोलिस अधिक्षक शहलभ माथूर यांनी दिली.